Tipu Sultan Row : सिरवार (कर्नाटक) येथे टिपू सुलतानच्या पुतळ्याला अज्ञातांनी चपलांचा हार घातल्याने हिंसाचार !
रायचूर (कर्नाटक) – कर्नाटकच्या सिरवार शहरातील टिपू सुलतानच्या पुतळ्याला ३१ जानेवारीला अज्ञाताने चपलांचा हार घातल्यानंतर येथे हिंसाचार झाला. लोकांनी महामार्ग रोखून रस्त्यावर टायर जाळले. तशीच येथे तोडफोड केली. पोलिसांनी या वेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमार केला. लोकांनी टिपू सुलतानच्या पुतळ्याला चपलांचा हार घालणार्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकचे काँग्रेस सरकार हिंसाचार करणार्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या हानीची भरपाई वसूल करणार का ? |