‘हनी ट्रॅप’द्वारे खंडणी वसूल करणारी टोळी गडचिरोली पोलिसांच्या कह्यात !
पत्रकार रविकांत कांबळेसह पोलीस कर्मचारी सुशील गवई अटकेत !
(‘हनी ट्रॅप’ म्हणजे मोहात पाडणे किंवा आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे आणि विविध कारणांसाठी त्याचा वापर करून घेणे होय. हेरगिरीविषयी ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली. आता पत्रकारितेत हा शब्द सर्वाधिक वापरला जातो.)
नागपूर – ‘हनी ट्रॅप’द्वारे खंडणी वसूल करणारी नागपूर येथील टोळी गडचिरोली पोलिसांनी कह्यात घेतली आहे. येथील एका ‘पोर्टल’चा गुन्हेगारी वृत्ते बनवणारा पत्रकार (क्राईम रिपोर्टर) रविकांत कांबळेसह पोलीस अंमलदाराला अटक करण्यात आली आहे. २६ जानेवारी या दिवशी गडचिरोली येथील एका शासकीय अभियंत्याने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. गडचिरोली पोलिसांनी रविकांत कांबळे याला नागपूर येथून कह्यात घेतले.
१. ३ जानेवारी या दिवशी शासकीय अभियंता कामानिमित्त नागपूर येथे गेले असता आरोपी आणि तक्रारदार यांचे जुने मित्र पोलीस कर्मचारी सुशील गवई यांनी नागपूर येथील उपाहारगृहात त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली.
२. तक्रारदार, तसेच २ महिला आरोपी खोलीत थांबले असता महिला आरोपीने तक्रारदारावर बलात्काराचा खोटा आरोप करून त्यांच्याकडून हे प्रकरण मिटवण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली.
३. सर्व आरोपींनी संगनमताने तक्रारदारावर बलात्कार केल्याचा आणि त्यातून महिला आरोपी गरोदर राहिल्याचा खोटा आरोप केला. गडचिरोली आणि नागपूर पोलिसांनी आरोपी सुशील गवई, रविकांत कांबळे, रोहित अहिर, ईशानी यांना कह्यात घेतले. या प्रकरणातील एक महिला आरोपी पसार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिका :
|