काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध पुणे येथे गुन्हा नोंद !
महापालिकेच्या अधिकार्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे प्रकरण !
पुणे – महापालिकेच्या अधिकार्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. महापालिकेच्या अभियंता संघाने या प्रकरणी सभा घेत धंगेकर यांच्या कृतीचा निषेध नोंदवला. धंगेकर यांच्यावर यापूर्वीही महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर चप्पल फेकल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गोखलेनगर परिसरातील महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीच्या लोकार्पण कार्यक्रमास काँग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करून आमदार धंगेकर यांनी नंदकिशोर जगताप यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमकावले होते.