धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होतांना पोलीस झोपले होते का ? अशा पोलिसांना नोकरीतून काढून टाका !
‘२१ जानेवारी २०२४ च्या रात्री पनवेल रेल्वेस्थानकावर भगवे ध्वज लावण्यास धर्मांध मुसलमानांनी केलेला विरोध आणि मीरा रोड येथे शोभायात्रा मिरवणुकीवर केलेले आक्रमण यानंतर २२ जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात ५ ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी दंगल माजवण्याचा प्रयत्न केला. कल्याण, मीरा रोड (जिल्हा ठाणे), पनवेल, नागपूर आणि रावेर (जिल्हा जळगाव) या ठिकाणी त्यांनी हिंदूंवर आक्रमण केले.’