आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सनातनची साधिका कु. गार्गी कोल्हापुरे हिला ‘रजत पदक’ प्राप्त !
सातारा, ३० जानेवारी (वार्ता.) – येथील सनातनची साधिका कु. गार्गी राहुल कोल्हापुरे हिने आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात ‘रजत पदक’ प्राप्त केले आहे. कु. गार्गी ही सातारा येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांची द्वितीय कन्या आहे. कु. गार्गी सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे. ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामुळेच मी हे यश मिळवू शकले’, असे सांगत तिने या यशाचे श्रेय आई-वडील आणि गुरुजन यांना दिले आहे.