दोन गावठी बंदुका आणि तीन जिवंत काडतुसे बाळगणारे तिघे अटकेत !
कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा !
नाशिक – दोन गावठी बंदुका आणि तीन जिवंत काडतुसे बाळगल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शुभम जाधव (वय २३ वर्षे), सचिन सोनवणे (वय २४ वर्षे) आणि गणेश भालेराव उपाख्य बॉबी (वय २४ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. यातील एकजण सराईत गुन्हेगार आहे. संशयितांनी गावठी बंदुका कुठून मिळवल्या ? ते बाळगण्याचे प्रयोजन काय ? याचीही चौकशी अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात येत आहे.