‘भारत स्वाभिमान न्यासा’चे मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी डॉ. परमार्थ देवजी महाराज यांची सदिच्छा भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा !

स्वामी डॉ. परमार्थ देवजी महाराज यांना पुस्तिका भेट देतांना श्री. सुनील कदम

पनवेल – पतंजलि योग परिवार, मुंबईच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी ‘भारत स्वाभिमान न्यासा’चे मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी डॉ. परमार्थ देवजी महाराज यांच्या सान्निध्यात योग शिबिर आणि मार्गदर्शन यांचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले होते. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी कामोठे येथे त्यांची भेट घेऊन समितीचे कार्य सांगितले, तसेच ‘हलाल जिहाद’ याविषयी चर्चा केली.

या वेळी स्वामीजी यांनी ‘समितीचे कार्य चांगले आहे’, असे सांगून आशीर्वादही दिले. ‘राष्ट्र-धर्माचे कार्य करण्यासाठी सशक्त शरीर पाहिजे आणि सशक्त शरिरासाठी नियमित योग-प्राणायाम करणे आवश्यक आहे’, असेही ते म्हणाले. या वेळी त्यांना समितीच्या कार्याची पुस्तिका आणि ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.