आरक्षणाविषयी काही लोकांकडून अफवा पसरवण्याचे काम ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते
जालना – आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने अध्यादेश काढला; मात्र त्यानंतर या अध्यादेशावर अनेक जणांकडून फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा समाजाची केवळ फसवणूक झाली आणि प्रमुख मागण्या मान्य झाल्या नाहीत, अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकांकडून चुकीची अफवा पसरवली जात आहे. मराठवाड्याला पूर्ण आरक्षण मिळणार असून एकही मराठा यापासून वंचित रहाणार नाही. जरांगे सध्या रायगड दौर्यावर आहेत. या वेळी अंतरवाली सराटी येथून निघतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.