चिंचवड, पुणे येथील सनातनच्या १०४ व्या संत पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी यांच्या शरिरामध्ये जाणवलेले पालट !
चिंचवड, पुणे येथील पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी यांच्या शरिरामध्ये जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
१. ‘३.८.२०२३ पासून पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी (पू. आईंचे) यांचे पाय, हात, केस यांत पालट जाणवत आहेत. पू. आईंची पावले गुलाबी दिसत आहेत. त्यांच्या हाताची बोटे, तसेच उजव्या हाताचा अंगठा पिवळसर दिसत आहे आणि हात गुलाबी दिसत आहेत.
२. १२.१२.२०२३ या दिवशी मी पू. आईंच्या केसांची वेणी घालत असतांना त्यांच्या केसांचा स्पर्श मऊसर जाणवत होता. पू. आईंचे केस पांढरे असले, तरी ते चमकदार आणि चंदेरी वाटत आहेत.’
– सौ. अपर्णा गंगाधर जोशी (पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी यांची मुलगी), चिंचवड, पुणे. (१२.१२.२०२३)