हिंजवडी (पुणे) येथील मोकळ्या जागेवर बांधकाम केल्याचे दाखवून २५ कोटी रुपयांचा अपहार !
‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या पिंपरी शाखा व्यवस्थापक शहाबाज जाफर यांचा अपप्रकार
पुणे – बांधकाम करण्यासाठी कर्ज हवे, या कारणासाठी बँकेत जमा केलेल्या कागदपत्रांचा अपलाभ करत, प्रत्यक्षात जागेवर बांधकाम झालेले नसतांनाही बांधकाम झाल्याचे दाखवून आणि खोटी स्वाक्षरी करून परस्पर २५ कोटी रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे पिंपरी शाखा व्यवस्थापक शहाबाज जाफर, विजय रायकर, महेश नलावडे आणि मंदाकिनी नलावडे यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी गौरव सोमानी यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. हा प्रकार वर्ष २०२० ते २०२४ या कालावधीत घडला.
तक्रारदार सोमानी यांचे ‘साई प्लॅटेनियम व्हेंचर’ या नावाने आस्थापन आहे. त्यांनी हिंजवडी येथील ७१ गुंठे जागेत बांधकाम करण्यासाठी कर्जाचा प्रस्ताव वर्ष २०२० मध्ये सादर केला होता. कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी लागल्यामुळे सोमानी पुन्हा बँकेत गेले नाहीत. त्यानंतर सोमानी यांना १० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज थकबाकी असल्याची नोटीस आली. त्यानंतर चौकशी केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. मुख्य आरोपी शाखा व्यवस्थापक शहाबाज जाफर यांची यापूर्वीही फसवणूक केल्याप्रकरणी बँक व्यवस्थापनाकडून २ वेळा चौकशी करण्यात आली होती. (यापूर्वी फसवणूक केल्याप्रकरणी शहाबाज जाफर यांची चौकशी कशा प्रकारे केली ? अशा प्रकारे चौकशी होत असेल, तर कधीतरी बँकेतील अपहार थांबेल का ? चौकशी केलेल्यांचीही चौकशी करून त्यांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिकास्वार्थासाठी समाजाची नीतीमत्ता किती प्रमाणात घसरली आहे, त्याचे उदाहरण ! |