बलुच लिबरेशन आर्मीकडून पाकच्या सैन्यतळावर आक्रमण
१० पोलीस ठार झाल्याचा दावा !
बलुचिस्तान (पाकिस्तान) – येथे बलुच लिबरेशन आर्मीने (बी.एल्.ए.ने) माच शहरात ३ आक्रमणे केली. यांत १ पोलीस ठार झाला, तर एक ट्रकचालक घायाळ झाला. या संघटनेने सुमारे १५ रॉकेटद्वारे हे आक्रमण केले. त्यांनी सैनिकी छावणी आणि मध्यवर्ती कारागृह यांना लक्ष्य केले. माच रेल्वे स्थानकात घुसून गोळीबार करण्यात आला. या वेळी बी.एल्.ए. संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चकमक उडाली. या आक्रमणांमध्ये १० पोलीस ठार झाल्याचा दावा बी.एल्.ए.कडून करण्यात आला आहे. ही संघटना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देत आहे
बलुचिस्तानचे माहिती मंत्री जान अचकझाई यांनी दावा केला की, सर्व आक्रमणे परतवून लावण्यात सुरक्षादलांना यश आले आहे.
सौजन्य झी न्यूज