भजनात ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ शब्द घालून म. गांधी यांनी भोळ्या जनतेची फसवणूक केली !
चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांचे विधान !
मुंबई – म. गांधी यांनी एका हिंदु भजनात ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ हे शब्द घालून ते भजन पालटले; पण त्यांना हे ठाऊक होते की, ईश्वर आणि अल्ला या विरोधी संकल्पना आहेत. भोळ्या जनतेला फसवण्याची ही एक युक्ती होती. गांधी यांनी स्वतःचाही यावर विश्वास नव्हता; कारण त्यांचे शेवटचे शब्द : ‘हे राम !’ होते, अशी पोस्ट चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी ‘एक्स’वर केली आहे. ‘रघुपती राघव राजा राम’ या भजनाविषयी त्यांनी ही पोस्ट केली आहे. अग्निहोत्री यांच्या या पोस्टवर समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
Gandhi altered a Hindu Bhajan by inserting ‘Ishwar Allah tero naam (ईश्वर अल्लाह तेरो नाम),’ fully aware that Ishwar & Allah are conceptually opposite. This was manipulation to deceive the innocent public. Even Gandhi did not believe in it.
No wonder, his last words: “हे राम!” pic.twitter.com/h9Uwgmi0Fc
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 30, 2024
संपादकीय भूमिका
|