२ विद्यार्थीनी शौचालय स्वच्छ करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर मुख्याध्यापक निलंबित !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेतील २ विद्यार्थीनी शौचालयांची स्वच्छता करत असतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. यावरून टीका होऊ लागल्याने शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित केले. कर्नाटकात गेल्या २ मासांत विद्यार्थिनींनी शौचालये स्वच्छ करण्यास लावण्यात आल्याची ही चौथी घटना आहे. यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये बेंगळुरू, कोलार आणि शिवमोग्गा येथे ३ प्रकरणे घडली होती. या प्रकरणांविषयी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी चिंता व्यक्त केली होती.