कर्नाटकात हनुमान ध्वज फडकावण्यात उत्तरदायी कर्मचार्याला जिल्हा पंचायत अधिकारी शेख तन्वीर यांनी केले निलंबित !
मंड्या (कर्नाटक) – कर्नाटकातील मंड्या येथे फडकावलेला १०८ फूट उंच हनुमान ध्वज हटवल्याच्या प्रकरणी हिंदु संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर केरागोडू ग्रामपंचायत विकास अधिकार्याला निलंबित करण्यात आले आहे. मंड्या जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेख तन्वीर आसिफ यांनी ३० जानेवारी २०२४ या दिवशी निलंबनाचा हा आदेश काढला.
सौजन्य टीव्ही 9 भारतवर्ष
केरागोडू गावात भारताचा राष्ट्रध्वजी फडकावण्यासाठी अनुमती देण्यात आली होती; परंतु ग्रामपंचायत विकास अधिकार्याने लोकांना हनुमान ध्वज फडकावण्याची संधी दिली आणि तो काढण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत, असे शेख तन्वीर आसिफ यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.
१. २८ जानेवारी २०२४ या दिवशी १०८ फूट उंच खांबावरून हनुमान ध्वज उतरवल्याच्या प्रकरणामुळे बराच वाद झाला होता. हनुमान ध्वज हटवल्याच्या विरोधात भाजप आणि हिंदु संघटना यांनी जोरदार निदर्शने केली. ‘ज्या राज्यात टिपू सुलतानचे फलक सर्वत्र दिसतात त्या राज्यात हनुमान ध्वज फडकवला तर काय अडचण आहे ?’, असे आंदोलकांचे म्हणणे होते. भाजपने काँग्रेस सरकारच्या धर्मनिरपेक्षतेवरही प्रश्न उपस्थित केले होते.
२. हनुमान ध्वज काढण्यात येणार असल्याचे कळताच गावातील लोक तेथे एकत्र आले. पोलिसांनी त्यांना हटवण्यासाठी लाठीमार केला आणि नंतर प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत हनुमान ध्वज काढून तेथे राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. या वेळी तेथील जमावाने भगवे झेंडे फडकावत ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.
३. हनुमान ध्वज हटवल्याच्या निषेधार्थ जमावाने केरागोडू ते मंड्या जिल्हा मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला.
संपादकीय भूमिकाकर्नाटकात धर्मांध जिहाद्यांनी शेकडो हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्या आहेत. त्या प्रकरणात कर्नाटकातील काँग्रेस सरकारने कधी तत्परतेने कारवाई केली आहे का ? काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष सर्वज्ञात आहे. त्यामुळे हिंदुद्वेषाचा कंड शमवण्यासाठी अशा तात्काळ कारवाई होणे साहजिक आहे ! |