१०३ वर्षांच्या हबीब नजर या वृद्धाने ४९ वर्षीय महिलेशी केला विवाह !
भोपाळ (मध्यप्रदेश) – हबीब नजर नावाच्या १०३ वर्षे वयाच्या स्वातंत्र्यसैनिकाने फिरोज नावाच्या एका ४९ वर्षीय महिलेशी विवाह केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील त्यांचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमातूंन मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. त्यांचा विवाह गेल्या वर्षी झाला असून दोघांना एकटेपणा जाणवत असल्याने त्यांनी विवाह केला.
सौजन्य : इंडिया टूडे
हबीब यांचे याआधी तीन विवाह झाले असून त्यांच्या शेवटच्या पत्नीचे निधन झाले आहे. तसेच फिरोज या महिलेच्या पतीचेही निधन झाले आहे. त्यामुळे दोघे विवाहबद्ध झाले असून याविषयी सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.