समृद्धी महामार्गावर ट्रकमधून ५० गायींची तस्करी !
|
वर्धा – येथून एक ट्रक संशयास्पदरित्या समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि तो पकडला. पोलिसांनी ट्रकची पडताळणी केल्यावर त्यात ५० हून पेक्षा अधिक गायी आढळल्या. हिंगणामध्ये ट्रकचालकासह २ जण ट्रक सोडून पसार झाले. पोलिसांनी अज्ञात गोतस्करांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांचा शोध चालू आहे.
सौजन्य एबीपी माझा
१. पोलिसांनी पाठलाग केल्यावर ट्रकचालक आणखी वेगात जाऊ लागला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून ट्रकला थांबवण्याचे प्रयत्न केले. तीन ठिकाणची नाकाबंदी तोडून ट्रक नागपूरच्या दिशेने जात होता.
२. त्याच वेळेस अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणार्या अकोला जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीही त्याचा पाठलाग केला. (गोरक्षणासाठी प्रयत्न करणार्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! – संपादक) काही वेळाने हिंगणा तालुक्यात एका निर्जन ठिकाणी ट्रक सोडून ट्रकमधील लोक पळून गेले.
३. ट्रकमध्ये गायींना कोंबल्याने त्यांतील अनेक गायींचा मृत्यू झाला होता, तर काही गायी गंभीर घायाळ झाल्या होत्या. (गोरक्षकांनी संघटित होऊन याविरोधात आवाज उठवला पाहिजे ! – संपादक)