पुणे जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळीची यशस्वी सांगता !
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी पोलीस, प्रशासन, शिक्षण विभाग आदी सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद !
पुणे – राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या २१ वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ या चळवळीद्वारे प्रबोधन करत आहे. या चळवळीच्या अंतर्गत पुणे, पिंपरी, चिंचवड ,नाशिक रोड,जुन्नर, तळेगाव,सासवड येथील ५५ हुन अधिक शाळांमध्ये निवेदन दिले. तसेच ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी व्याख्याने घेण्यात आली, यासमवेत हस्तपत्रके वितरित करणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर राष्ट्रजागृतीपर ध्वनीचकत्या (सीडी) दाखवणे, विविध ठिकाणी प्रबोधन कक्ष लावून राष्ट्रध्वजाचे महत्त्व विषद करण्यात आले, तसेच फलक लिखाण, सामाजिक माध्यमाद्वारे जनप्रबोधन करणे आदी गोष्टी करण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग आदी ठिकाणीही ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ याविषयी निवेदने देण्यात आली. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शाळा महाविद्यालयांमध्ये प्रतिज्ञा घेण्यात आली. मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत करण्यासाठी विविध शाळांमध्ये क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले. पुणे जिल्ह्यात ही चळवळ यशस्वी होण्यासाठी साधना सत्संगातील जिज्ञासू, धर्मशिक्षणवर्गातील आणि शाखेतील धर्मप्रेमी अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा सहभाग लाभला. या चळवळीला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शाळा कॉलेज मधील सर्व विद्यार्थ्यांनी विषय शांतपणे ऐकून घेतला आणि भारतमातेचा जयघोष केला, तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना विषय आवडला, अशी जनजागृती करणे ही काळाची आवश्कता आहे, असे मत त्यांनी व्यक्त करून समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानेही राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही नक्की करू, असे आश्वासन दिले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागांतील ५ शाळांमध्ये ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. यामध्ये १ सहस्र १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला.
२. सासवड येथील हिंदु जनजागृती समितीच्या हिवरे गाव शाखेतील धर्मप्रेमींनी सासवड पोलीस ठाण्यात ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ यासंदर्भात निवेदन दिले. हे निवेदन उपनिरीक्षक ढेकळे यांनी स्विकारले.
३. चिंचवड भागात एका शाळेमध्ये क्रांतीकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाचा ९० हून अधिक विद्यार्थी आणि ८ शिक्षक यांनी लाभ घेतला.