महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील तरुण मानसिक आजाराने त्रस्त !
राज्य सरकारने चालू केलेल्या ‘टेलिमानस’च्या माध्यमातून उघड !
मुंबई – राज्यातील नागरिकांना तणावमुक्त करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारने ‘टेलिमानस’ हे कॉल सेंटर चालू केले होते. वर्ष २०१२ मध्ये सहस्रो तरुणांनी सर्वाधिक संपर्क यावर केले आहेत. त्यातही १८ ते ४५ वयोगटातील ७३.०५ टक्के तरुणांनी संपर्क करून त्यांच्या समस्या मांडल्या.
४६ ते ६४ वयोगटातील १६ टक्के नागरिकांनी येथे संपर्क केला. १३ ते १७ वयोगटातील ४.३ टक्के, १२ वर्षांखालील मुलांचे प्रमाण १.२ टक्के आणि ६५ वर्षांवरील नागरिकांचे संपर्क करण्याचे प्रमाण ४.९ टक्के इतके होते.
संपादकीय भूमिका :महासत्तेच्या दिशेने जाणार्या भारतातील तरुण तणावग्रस्त असणे हे देशासाठी लज्जास्पदच होय ! ही स्थिती पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत ! |