हुपरी येथील हिंदु धर्म-जागृती सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीरामभक्त आणि हिंदू यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ! – सकल हिंदु समाज
कोल्हापूर – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह भाग्यनगर येथून सहस्रो किलोमीटरवरून प्रवास करून केवळ हिंदु बांधवांना संबोधित करण्यासाठी हुपरी येथे येत आहेत. नुकत्याच रायपूर (छत्तीसगड) येथे बागेश्वर धामच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत मी माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे’, अशी घोषणा त्यांनी केली आहे. तरी सर्व हिंदूंनी हिंदु धर्मासाठी ३ ते ४ घंटे वेळ काढून ३० जानेवारी या दिवशी हुपरी येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी सायंकाळी ५.३० वाजता होणार्या हिंदु धर्म-जागृती सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल हिंदु समाजाच्या वतीने श्री. दीपक देसाई यांनी केले. सकल हिंदु समाजाच्या वतीने २८ जानेवारीला हिंदु एकताच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत हे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे तालुकाध्यक्ष श्री. अमर जाधव, बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. आप्पासाहेब बन्नेनवार, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. नामदेवराव जाधव, सचिव श्री. दौलतराव मोहिते, हिंदुत्वनिष्ठ श्री. संदीप घाटगे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, श्री. कैलास (आबा) जाधव, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. अनिल दिंडे उपस्थित होते.