समाज जोडण्याची संवेदना संस्कृत भाषेमध्ये आहे ! – रवींद्र साठे, अध्यक्ष, खादी ग्रामोद्योग कमिशन

पुणे येथील ‘वाग्विलासिनी संस्कृत संमेलना’चा उद्घाटन सोहळा !

रवींद्र साठे

पुणे – संस्कृत भाषा जीवनमूल्ये शिकवते. समाज जोडण्याची संवेदना संस्कृत भाषेमध्ये आहे. ती आपल्या मनात आली पाहिजे. संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ती व्यवहारामध्ये वापरली गेली पाहिजे. त्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत ‘खादी ग्रोमोद्योग कमिशन’चे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी मांडले. ते ‘संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत’, ‘पुणे महानगर सिंहगड जनपद’ आणि ‘शिक्षक प्रसारक मंडळ’ यांच्या वतीने आयोजित केलेल्य ‘वाग्विलासिनी संस्कृत संमेलना’च्या उद्घाटन सोहळ्यामध्ये बोलत होते.

या वेळी उपस्थित असलेले बुलढाणा अर्बन को-ऑप. सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे म्हणाले की, दैनंदिन जीवनाच्या व्यवहारामध्ये भाषाप्रेम कृतीतून व्यक्त झाले पाहिजे. भाषा प्रेमाच्या जोडीला संवेदनशीलता असेल, तर माणसे जोडण्याचे कामही त्यातून होईल.