सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर ४ ते ५ दिवसांतच साधिकेचे त्रास दूर होणे
१. नामजपादी उपाय करूनही आध्यात्मिक त्रास न्यून न होणे
‘१५.३.२०२३ या दिवशी मला आध्यात्मिक त्रास होत होता. रात्री झोपल्यावर माझे शरीर जखडल्यासारखे झाले. मी ५ मिनिटे त्याच स्थितीत होते. मला असा त्रास दुपारी विश्रांती घेतांनाही होत असे. मला कधीतरी भीतीदायक स्वप्न पडत असे. तेव्हा मी घाबरून उठत असे आणि नंतर मला झोप लागत नसे. मी साधनेत आल्यावर १० वर्षांपासून असे त्रास मला मधून मधून होत होते. यासाठी मी नामजपादी उपाय करत होते; पण त्रास न्यून होत नव्हता.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय
हे त्रास दूर होण्यासाठी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी सांगितले, ‘‘पूर्वजांच्या त्रासांमुळे असे होत आहे.’’ त्यांनी मला झोपण्यापूर्वी अर्धा घंटा ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप करायला सांगितला, तसेच स्वतःभोवती सूक्ष्मातून नामाचे संरक्षककवच करायला सांगितले.
३. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले वरील उपाय केल्यावर ४ ते ५ दिवसांतच मला होत असलेले सर्व त्रास दूर झाले.
मी सद्गुरु गाडगीळकाकांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. वर्षा अग्निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.५.२०२३)
|