सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय केल्यावर पायदुखी पूर्णपणे थांबणे
‘वर्ष २०२३ च्या जून मासात माझा पाय ३ वेळा सुजला आणि वेदना होऊन मला पाय भूमीवर ठेवता येत नव्हता. औषधोपचार करूनही मला बरे वाटत नव्हते. १८.८.२०२३ या दिवशी मी पू. दीपाली मतकर (सनातन संस्थेच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. दीपाली मतकर) यांना भ्रमणभाष करून माझ्या पायाच्या त्रासांविषयी सांगितले. त्यांच्याशी बोलल्यावर मला हलके वाटले.
१९.८.२०२३ या दिवशी पू. दीपालीताई यांनी मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे ‘श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नम: शिवाय। ॐ नम: शिवाय।’ हा देवतांचा एकत्रित नामजप करण्यास सांगितला. हा नामजप पाचही बोटे एकत्र करून अनाहतचक्रावर मुद्रा करून प्रतिदिन २ घंटे करण्यास सांगितला होता. मी हा नामजप ‘गुरुदेवांच्या चरणांजवळ बसून करत आहे आणि गुरुदेवांचे चैतन्य माझ्या सहस्रारचक्रातून संपूर्ण शरिरात जात आहे’, असा भाव ठेवून केला. गुरुदेवांच्या कृपेने माझ्या पायाचा त्रास नाहीसा झाला. ही अनुभूती दिली, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– (पू.) श्रीमती पुतळाबाई देशमुख (माई देशमुख) (सनातन संस्थेच्या ७६ व्या (व्यष्टी) संत, वय ७४ वर्षे), तुळजापूर (६.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |