भाजप सत्तेत असतांना ‘ओबीसी’वर अन्याय होऊ देणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
नागपूर – आमचे सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. जोपर्यंत भाजप सत्तेत आहे, तोपर्यंत आम्ही ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. असे काही झाले, तर मी स्वतः वरिष्ठांशी बोलणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी २९ जानेवारी या दिवशी येथे केले. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढल्याने ओबीसी आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. या निर्णयाच्या विरोधात ओबीसी संघटना आणि नेते आक्रमक भूमिका घेत आहेत.