Indian Navy Rescue Operation : सोमालियाच्या समुद्री दरोडेखोरांनी कह्यात घेतलेल्या इराणी नौकेची भारतीय युद्धनौकेने केली सुटका !
कोची (केरळ) – सोमालियाच्या समुद्री दरोडेखोरांनी (चाच्यांनी) कोचीच्या पश्चिमेला सुमारे ७०० समुद्री मैलांवर इराणी मासेमारी नौका कह्यात घेतली होती. या घटनेनंतर भारतीय नौदलाने या नौकेच्या सुटकेसाठी आय.एन्.एस्. सुमित्रा युद्धनौका तैनात केली. या युद्धनौकेने केलेल्या कारवाईनंतर इराणी नौकेची सुटका करण्यात आली. ‘एम्.व्ही. इमान’ असे या इराणी नौकेचे नाव असून त्यात १७ कर्मचारी होते.
Swift response by #IndianNavy‘s Mission Deployed warship ensures safe release of hijacked vessel & crew.#INSSumitra, on #AntiPiracy ops along East coast of #Somalia & #GulfofAden, responded to a distress message regarding hijacking of an Iranian flagged Fishing Vessel (FV)… pic.twitter.com/AQTkcTJvQo
— SpokespersonNavy (@indiannavy) January 29, 2024
Sri Lankan fishing boat hijacked by Somali pirates#IndianNavy 🇮🇳 to assist in its rescue !
The Sri Lankan Navy 🇱🇰 detains Indian fishermen for entering its alleged maritime boundary; but exhibits inertia for the release of its own boat and it requires India to extend… pic.twitter.com/TANZ4UgXNF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 29, 2024
भारतीय युद्धनौकेने तिच्यावरील ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे इराणी नौकेला वेढा घातला आणि दरोडेखोरांना शस्त्रे खाली ठेवून सोमालियाच्या दिशेने जाण्यास सांगितले. यानंतर नौदलाने नौकेतील सर्व कर्मचार्यांची सुखरूप सुटका केली.