Baloch People Wants Separation : बलुची लोकांना पाकिस्तानपासून वेगळे व्हायचे आहे ! – पाकिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान

बलुची लोकांची इच्छा बोलून दाखवल्याची कुणा पाकिस्तानी नेत्याची ही पहिलीच वेळ !

अनवर उल् हक काकर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – बलूचिस्तानचे लोक पाकिस्तानविषयी केवळ असंतुष्टच नाहीत, तर ते वेगळ्या देशाची मागणी करत आहेत, असे वक्तव्य पाकचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल् हक काकर यांनी केले आहे. कुणा पाकिस्तानी नेत्याने बलुची लोकांची इच्छा बोलून दाखवल्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘बलूचिस्तान पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार काकर यांनी वरील वक्तव्य एका मुलाखतीत केले आहे. काकर यांनी या वेळी बलुची लोकांच्या अचानक गायब होण्याच्या सूत्रावरही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, या लोकांना शोधून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बलूचिस्तानच्या लोकांना वेगळी ओळख हवी आहे. हेच संपूर्ण समस्येचे मूळ आहे.

संपादकीय भूमिका 

अशाच प्रकारे पाकव्याप्त काश्मिरातील जनतेची भारताचा भाग होण्याची इच्छा आहे. अर्थात् जिहादी मानसिकतेचे पाकिस्तानी नेते असे वक्तव्य कधीच करणार नाहीत. भारताला पाकव्याप्त काश्मीरला कह्यात घेण्यासाठी सैनिकी कारवाईच करावी लागेल, हेही तितकेच खरे !