Srilanka Ship Hijacked : सोमालियाच्या समुद्री दरोडेखोरांकडून श्रीलंकेच्या मासेमारी करणार्‍या नौकेचे अपहरण

भारतीय नौदल सुटकेसाठी साहाय्य करणार !

नवी देहली – श्रीलंकेच्या एका मासेमारी करणार्‍या नौकेला सोमालियातील समुद्री दरोडेखोरांनी अपहरण केले आहे. या नौकेच्या सुटकेसाठी भारतीय नौदल साहाय्य करील, असे आश्‍वासन भारताने दिले आहे. ‘लोरेन्झो पुथा-४’ ही नौका १६ जानेवारी या दिवशी श्रीलंकेतील डिकोविटा बंदरातून अनेक दिवसांच्या मासेमारीच्या प्रवासासाठी निघाली होती. यावर ६ मासेमार उपस्थित आहेत.

सौजन्य : न्यूजफर्स्ट इंग्लिश 

संपादकीय भूमिका 

श्रीलंकेचे नौदल भारतीय मासेमारांना त्याच्या कथित सागरी सीमेमध्ये प्रवेश केल्यावर अटक करते; मात्र स्वतःच्या अपहरण झालेल्या नौकेच्या सुटकेसाठी निष्क्रीय रहाते आणि भारताला त्यासाठी श्रीलंकेला साहाय्य करावे लागते ! हे पहाता भारताने श्रीलंकेवर भारतीय मासेमारांवर होणारी कारवाई थांबवण्यासाठी दबाव टाकला पाहिजे !