ISIS Attack Church In Turkiye : इस्तंबूल (तुर्कीये) येथील चर्चवर इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांचे आक्रमण ! – १ जण ठार
इस्तंबूल (तुर्कीये) – इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांनी येथील सांता मारिया कॅथॉलिक चर्चवर सकाळी केलेल्या आक्रमणात १ जण ठार झाला. आक्रमण करणारे दोघेही आतंकवादी परदेशी नागरिक आहेत. त्यांपैकी एक ताजिकिस्तानचा नागरिक आहे आणि दुसरा रशियाचा नागरिक आहे. तुर्कीयेच्या राष्ट्रपतींनी या आक्रमणाचा निषेध केला असून चर्चला पाठिंबा दर्शवला आहे.
सौजन्य : वनइंडिया न्यूज
१. गृहमंत्री अली येर्लिकाया यांनी सांगितले की, आतंकवाद्यांना पकडण्यासाठी शहरात ३० हून अधिक ठिकाणी धाडी टाकून ४७ जणांना कह्यात घेण्यात आले. बर्याच प्रयत्नांनंतर दोन्ही आतंकवादी पकडले गेले.
I$l@mic State terrorists attack a Church in Turkiye's #Istanbul ! : 1 deadpic.twitter.com/kOktT7MXBP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 29, 2024
२. ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. इटलीच्या राष्ट्राध्यक्षा जॉर्जिया मेलोनी यांनीही शोक व्यक्त केला आहे.