शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांना ‘ई-मेल’द्वारे धमकी !
मुंबई – शिवसेनेचे सचिव तथा प्रवक्ते किरण पावसकर यांना ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष विचारे यांनी ‘तुम्ही मातोश्रीच्या विरोधात बोलू नये’, अशी ईमेलद्वारे धमकी दिली आहे. सुभाष विचारे हे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. ‘गद्दार ! गद्दार ! गद्दार ! तुमच्या ४० गद्दारांची बाळासाहेबांच्या मातोश्रीशी टक्कर देण्याची लायकी नाही. तुम्ही सर्व ४० जण त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या….. घुसा’, असे ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष विचारे यांनी धमकी दिलेल्या मेलमध्ये म्हटले आहे.