श्रीराममंदिराची प्रतिकृती पहाण्यासाठी भाविकांचा प्रतिसाद : प्रतिदिन होम-हवन !
मिरज – अयोध्या येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या पुढाकाराने मिरज शहरात श्रीराममंदिराची प्रतिकृती तालुका क्रीडा संकुल येथे उभारण्यात आली आहे. या मंदिरात १४० खांब असून २५ सहस्र स्क्वेअर फुटांवर हे मंदिर उभारण्यात आले आहे. येथे प्रतिदिन २१६ जोडप्यांच्या उपस्थितीत होम-हवन करण्यात येत आहे. ही प्रतिकृती पहाण्यास मिरज शहर आणि परिसरातील भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असून योग्य प्रकारे नियोजन केल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
या संयोजनात भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, राहुल कुरले, अभिजित लाड, अनिल हारगे, उमेश हारगे, जयगोंड कोरे, अनिता हारगे यांचा प्रमुख समावेश असून पुरोहित विश्वेश बेडगकरगुरुजी, विवेक बोंद्रेगुरुजी, आठवलेगुरुजी, फडकेगुरुजी, जोशीगुरुजी यांचा यज्ञाच्या पौरोहित्यामध्ये प्रमुख सहभाग आहे.