कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (‘आर्टिफिशिअल इंटलिजन्स’च्या) आधारे बनवण्यात आलेले श्रीरामाचे चित्र !
१. सामाजिक माध्यमातून कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे बनवण्यात आलेले श्रीरामाचे चित्र मिळणे; पण ‘त्यात श्रीरामाची स्पंदने जाणवत नाहीत’, असे सनातनच्या साधिकांनी सांगणे
‘मला सामाजिक माध्यमातून प्रभु श्रीरामाचे एक चित्र मिळाले. त्या चित्राखाली ‘हे चित्र कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (‘आर्टीफिशिअल इंटलिजन्स’च्या) आधारे बनवण्यात आले आहे’, असे लिहिले होते. मी ते चित्र रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात कलेच्या माध्यमातून साधना करणार्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. भाविनी कापडिया आणि सौ. जान्हवी शिंदे यांना पाठवले. ते चित्र पाहिल्यावर त्यांनी मला कळवले, ‘या चित्रात श्रीरामाची स्पंदने जाणवत नाहीत.’
२. सामाजिक माध्यमांतून ‘हे चित्र रामायणातील श्रीरामाच्या वर्णनाशी जुळत नाही’, अशा श्रीरामाच्या स्थूल रूपाच्या वर्णनाविषयी असलेल्या भेदांविषयी प्रतिक्रिया वाचायला मिळणे
नंतर सामाजिक माध्यमांतून ‘या चित्रातील श्रीरामाचा रंग, केशरचना आदी रामायणातील श्रीरामाच्या वर्णनाशी जुळत नाही’, अशा आशयाची माहिती वाचनात आली. समाजातील काही लोकांना ‘या चित्राशी श्रीरामाचे स्थुलातील वर्णन जुळत नाही’, असे जाणवत होते; पण सनातनच्या साधिकांना श्रीरामाच्या या चित्रात सूक्ष्मातून श्रीरामाची स्पंदने जाणवली नाहीत. ते इतर कुणालाही जाणवले नाही.
३. कृत्रिम बुद्धीमत्तेची मर्यादा !
‘कृत्रिम बुद्धीमत्तेला कितीही माहिती पुरवली, तरी तिने बनवलेल्या देवतेच्या चित्रामध्ये त्या देवतेची स्पंदने आली आहेत’, असे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यासाठी ‘सूक्ष्म स्पंदने जाणू शकणार्या साधकांचीच आवश्यकता आहे’, असे माझ्या लक्षात आले.
४. ‘श्रीरामाचे चित्र ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’ने बनवले, म्हणजे ते अचूकच असणार’, असा विश्वास असणारे अनेक जण ते चित्र पाहून भ्रमित झाले; पण सूक्ष्म स्पंदने जाणणार्या सनातनच्या साधिका भ्रमित झाल्या नाहीत.
५. सूक्ष्म स्पंदने ओळखायला शिकवणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जाणवलेले अद्वितीयत्व !
प.पू. डॉक्टरांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सूक्ष्मातील प्रयोगांद्वारे साधकांना पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, म्हणजेच सूक्ष्मातील स्पंदने अनुभवण्यास शिकवली आणि अजूनही शिकवत आहेत. त्यामुळे सनातनच्या अनेक साधकांमध्ये एखाद्या वस्तूकडे सूक्ष्म स्पंदनांच्या दृष्टीकोनातून पहाण्याची आणि सूक्ष्म स्पंदने जाणू शकण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
अशी अद्वितीय शिकवण देणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः प्रणाम !’
– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, देवद, पनवेल, महाराष्ट्र. (११.४.२०२३)