मराठवाड्यातील भक्ताकडून श्री विठ्ठलाला ८२ तोळ्यांची सोन्याची घोंगडी अर्पण !
पंढरपूर – पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीला लोकरीची घोंगडी पांघरली जाते. यंदा २६ जानेवारीला मराठवाड्यातील एका भक्ताकडून श्री विठ्ठलाला ८२ तोळ्यांची सोन्याची घोंगडी अर्पण करण्यात आली आहे. याचे मूल्य ५५ लाख रुपये आहे. त्यामुळे श्री विठ्ठलाला आता सोन्याची घोंगडी पांघरली जाणार आहे. या भक्ताने त्याचे नाव गुप्त ठेवावे, अशी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका :श्री विठ्ठलाला सोन्याची घोंगडी अर्पण करणारे भक्त कलियुगात असणे, ही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराकच ! |