अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मंदिराची स्थापना झाल्याने विश्वात रामराज्याची स्थापना होऊन सुवर्णयुगाचा प्रारंभ लवकरच होणार असणे
‘अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मंदिराची स्थापना होण्यासाठी सुमारे ५०० वर्षांपासून रामभक्त हिंदूंचे अविरत प्रयत्न चालू होते. त्यांनी प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारण्यासाठी स्वतःच्या परीने योगदान केले आहे. विश्वभरातील अशा रामभक्त हिंदूंच्या प्रयत्नांमुळेच आज अयोध्येत प्रभु श्रीरामाचे मंदिर उभे रहात आहे. हे रामभक्त आणि श्रीराम यांच्या चरणी अनन्यभावाने वंदन करून हा लेख कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे.
१. अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मंदिराची स्थापना होण्यासाठी विविध योगमार्गांनी साधना करणार्या श्रीरामाच्या भक्तांनी दिलेले अनमोल योगदान !
२. प्रभु श्रीराम हा संपूर्ण विश्वातील हिंदूंचे संघटन करणारा दुवा असणे
भारत आणि विदेश येथे वास्तव्य करणार्या विविध भाषा, जात अन् संप्रदाय असलेल्या हिंदूंनी आपापल्या परीने प्रभु श्रीरामाच्या मंदिराची स्थापना होण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे प्रभु श्रीरामाची भक्ती ही हिंदूऐक्यासाठी लाख मोलाची ठरली आहे. अशा प्रकारे प्रभु श्रीराम केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण विश्वातील हिंदूंचे संघटन करणारा दुवा आहे. त्यामुळे अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मंदिराची स्थापना करण्याच्या कार्यात सहभागी झालेल्या विविध ठिकाणच्या रामभक्तांमध्ये सांघिकभाव निर्माण होऊन कर्महिंदूंची नवीन फळी निर्माण झाली आहे. हिंदूंच्या या ऐक्यामुळेच संपूर्ण विश्वात लवकरच रामराज्याची स्थापना होऊन एका सुवर्णयुगाचा प्रारंभ होणार आहे.
३. श्रीराम केवळ मनुष्यासाठीच नव्हे, तर निसर्गातील प्रत्येक घटकासाठी पूजनीय असणे
प्रभु श्रीराम आदर्श राजाचे प्रतीक असल्यामुळे तो केवळ मनुष्याचेच नव्हे, तर विश्वातील प्रत्येकाचे दायित्व सांभाळत आहे. त्रेतायुगात शेषनागाचा अवतार लक्ष्मण आणि समस्त नाग, कपिश्रेष्ठ हनुमान, सुग्रीव, अंगद अन् नल-नील इत्यादी वानरांची सेना, जांबुवंतासारखे अस्वल, जटायू आणि संपाती यांसारखे पक्षी, खार अन् गरुड इत्यादी प्रभु श्रीरामाच्या अवतारीकार्यात सहभागी झाले होते.
या घटना म्हणजे चराचरातील जिवांना रामतत्त्वाची अनुभूती आल्याचे द्योतक आहे. यावरून ‘श्रीराम केवळ मनुष्यासाठीच नव्हे, तर निसर्गातील प्रत्येक घटकासाठी पूजनीय आहे’, हे लक्षात येते.
४. प्रभु श्रीराम हे केवळ भारताचेच नव्हे, तर संपूर्ण विश्वाचे दैवत असणे
अमेरिकेतील हिंदूंनी श्रीरामाप्रती भक्ती व्यक्त करण्यासाठी भव्य वाहन फेरी काढली. त्याचप्रमाणे जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये ‘प्रभु श्रीरामाच्या मंदिराच्या स्थापनेच्या अंतर्गत विविध शोभायात्रा काढणे, संबंधित देशांतील मंदिरांमध्ये प्रभु श्रीरामासाठी भजन-कीर्तन, तसेच पूजा-अर्चना करणे’, यांसारख्या धार्मिक कृती करण्यात आल्या. यावरून श्रीराम केवळ भारताचेच नव्हे, तर संपूर्ण विश्वाचे दैवत असल्याचे सिद्ध होत आहे.
५. अयोध्येत श्रीराममंदिराच्या स्थापनेच्या अंतर्गत झालेल्या किंवा होणार्या विविध धार्मिक विधींच्या वेळी सूक्ष्मातून घडलेली प्रक्रिया आणि आध्यात्मिक स्तरावर भाविकांना झालेला लाभ !
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)(सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०२४)
|