परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधकांनी काळानुसार ‘निर्विचार’ हा नामजप करावा’, असे सांगितल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे
‘१४.५.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली ‘साधकांनी काळानुसार ‘निर्विचार’ हा नामजप करावा’, अशा आशयाची सूचना वाचली. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
मला जाणवले, ‘काळ शीघ्र गतीने पुढे जात आहे; मात्र आम्हा साधकांची गती न्यून पडत आहे. काळाच्या गतीला धिराने सामोरे जाण्यासाठी (मॅच होण्यासाठी) परात्पर गुरु डॉक्टर साधकांना गतीने पुढे नेत आहेत.’ माझी त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’
– सौ. भक्ती गुरुदास खंडेपारकर (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४५ वर्षे)