देवराणा, सोबतीला घेऊन संत मेळा ।
‘एकदा गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील आणि धर्मप्रसारातील संतांना एकत्रित भेटले.त्यांचा सत्संग असल्याचे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि मला पुढील ओळी सुचल्या,
देवराणा, सोबतीला घेऊन संत मेळा ।
अज्ञानी आम्ही समजेना त्याची कृपा ।। १ ।।
आनंदाचे डोही आनंद तरंग ।
भक्तीमय झाले अंतःकरण ।। २ ।।
सार्यांच्या मनीचे भाव निराळे ।
सेवेचे प्रत्येकाच्या स्वरूप वेगळे ।। ३ ।।
तरीही आतून एकासी मिळाले ।
तव कृपेने आम्हीही अनुभवले ।। ४ ।।
एकमेकांप्रती उच्चभाव त्यांचा ।
साक्षीदार जीव हा त्या भाव क्षणांचा ।। ५ ।।’
– सौ. स्वाती शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |