Houthi Rebels Attack : हुती बंडखोरांकडून ब्रिटनच्या तेलवाहू नौकेवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण !
भारतीय युद्धनौकेने ब्रिटीश नौकेवरील २२ भारतियांसह २५ कर्मचार्यांचा वाचवले !
जेरुसलेम (इस्रायल) – येमेनच्या हुती बंडखोरांनी एडनच्या आखातात ब्रिटनची तेलवाहू नौका ‘मार्टिन लँड’वर क्षेपणास्त्राने आक्रमण केल्याने या नौकेला आग लागली. या आक्रमणाची माहिती मिळताच भारतीय नौदलाची युद्धनौका आय.एन्.एस्. विशाखापट्टणम् घटनास्थळी पोचली आणि साहाय्यकार्य प्रारंभ केले. ही आग आटोक्यात आणण्यात आली. या नौकेवरील २२ भारतियांसह सर्व २५ जणांना वाचवण्यात आले.
#IndianNavy‘s Guided missile destroyer, #INSVisakhapatnam, deployed in the #GulfofAden responded to a distress call from MV #MarlinLuanda on the night of #26Jan 24.
The fire fighting efforts onboard the distressed Merchant Vessel is being augmented by the NBCD team along with… pic.twitter.com/meocASF2Lo— SpokespersonNavy (@indiannavy) January 27, 2024
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्धनौकांची संख्या ६ वरून १० पर्यंत वाढवून हुती बंडखोरांच्या आक्रमणांशी दोन हात करणे चालू केले आहे.
Houthi rebels attack British oil tanker with missiles.
Indian warship 🇮🇳 rescues 22 Indians along with 25 crew members on the British🇬🇧 vessel.#IndianNavy #RedSeapic.twitter.com/LpC7iTcBsh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 28, 2024
दुसरीकडे अमेरिका आणि ब्रिटन येमेनमध्ये हुती बंडखोरांच्या तळांवर हवाई आक्रमणे करत आहे.