आज सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि विविध संघटनांची बैठक !
मुंबई – छगन भुजबळ यांनी २८ जानेवारीचे सर्व कार्यक्रम रहित केले असून त्या दिवशी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथील शासकीय निवासस्थानी सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यात येईल. ‘या बैठकीला मोठ्या संख्येने लोकांनी यावे’, असे आवाहन त्यांनी केले आहे.