सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणार्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी केली अटक
ठाणे, २७ जानेवारी (वार्ता.) – सामाजिक माध्यमांवर धार्मिक भावना दुखावणे, तसेच चिथावणी देणारी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणे यावरून २ व्यक्तींवर मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
डॉ. पप्पूकुमार बोदेसम गौतम या व्यक्तीने प्रभु श्रीराम यांच्या संदर्भातील धार्मिक श्रद्धा दुखावण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करून हिंदु धर्मियांच्या श्रद्धास्थानाचा अपमान केला होता, तर असद जाकीर हुसेन रईन यानेही त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर बाबरी मशिदीविषयी आक्षेपार्ह लिखाण प्रसारित करून मुसलमान धर्मियांमध्ये धार्मिक तेढ वाढेल, असे लिखाण प्रसारित केले होते. या दोघांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.