राज्यात १८ वर्षांखालील ६ लाख पुरुषांना उच्च रक्तदाब, तर ४ लाख जणांना मधुमेह !
पुणे – राज्यात गेल्यावर्षी सप्टेंबरपासून चालू झालेले आणि मार्चपर्यंत असणार्या ‘निरोगी तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानाद्वारे १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीद्वारे आतापर्यंत राज्यात अडीच कोटी पुरुषांची तपासणी करण्यात आली असून त्याद्वारे ३६ लाख पुरुषांना उच्च रक्तदाब, तर ४ लाख जणांना मधुमेह आढळून आला आहे. या अभियानाद्वारे राज्यातील १८ वर्षांवरील ४ कोटी ६७ लाख पुरुषांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे, हिंदु हृदयसम्राट आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय अशा विविध स्तरांवरील आरोग्य संस्थांमध्ये ही तपासणी केली जात आहे.