मंगळुरू येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राधा मंजुनाथ (वय ६७ वर्षे) यांना भक्तीसत्संगाच्या वेळी आलेली अनुभूती

भक्तीसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी गुरुदेवांना मानस प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्यानंतर गुरुदेवांनी ही कृती आधीच करवून घेतल्याची जाणीव होऊन भावाश्रू येणे

सौ. राधा मंजुनाथ

‘१६.१२.२०२१ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मानस प्रदक्षिणा घालण्यास सांगितले. ते ऐकल्यानंतर माझी पुष्कळ
भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले; कारण भक्तीसत्संगाच्या ४ दिवस आधीपासूनच मी नामजप करतांना मानसरित्या विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे चरण धुऊन त्यावर पुष्प अर्पण करत होते. त्यानंतर त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालत होते. त्या वेळी ‘विष्णुस्वरूप प.पू. गुरुदेव क्षीरसागरात शेषनागावर पहुडले आहेत आणि मी त्यांना प्रदक्षिणा घालत आहे’, असा भाव ठेवून मी प्रयत्न करत होते. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात सांगितलेली कृती गुरुदेवांनी माझ्याकडून आधीच करून घेतली’, असे वाटून माझी भावजागृती झाली.

‘हे गुरुदेवा, तुमची कृपा अगाध आहे. आम्ही तुम्हाला ओळखायला अल्प पडतो. देवा, तुम्ही मला ही अनुभूती देऊन पुन्हा एकदा तुमच्या कृपेची अनुभूती दिलीत. त्यासाठी आपल्या कोमल चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– सौ. राधा मंजुनाथ (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६७ वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (१९.१२.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक