मद्याची अवैध वाहतूक आणि विक्री यांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन करण्याची चेतावणी द्यावी लागते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या मद्याची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाहतूक आणि विक्री केली जात आहे. मद्याची अवैध वाहतूक रोखावी, यासाठी आंदोलने करूनही या प्रकारांकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे ही वाहतूक तात्काळ रोखावी अन्यथा आंदोलन करू, अशी चेतावणी मनसेच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना घेराव घालून देण्यात आली.’ (१८.१२.२०२३)