धारवाड, कर्नाटक येथील श्री. चिदंबर पी. निंबरगी यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला आल्यावर जाणवलेली सूत्रे !
१. आश्रमातील अनेक संतांचे दर्शन झाल्यावर ‘घरच्यांनाही त्यांचे दर्शन घडावे’, असे वाटणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी जेवण, निवास आणि वाहन यांच्या व्यवस्थेची सेवा करणारे पुण्यवान आहेत. मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात उशिरा आल्याबद्दल मला खंत वाटते. मी आश्रमातील अनेक संतांना जवळून पाहिले; पण काही बोललो नाही. मी रोमांचित झालो. ‘आता घरच्यांनाही आश्रमात आणून त्यांनाही संतांचे दर्शन घडवावे’, असे मला वाटते.
२. ‘कुलदेवता’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करण्यास आरंभ केल्याने चैतन्य मिळणे आणि इतरांनाही हे नामजप करण्यास सांगण्याचा निश्चय करणे
मी महोत्सवाला आल्यापासून ‘कुलदेवता’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करण्यास आरंभ केला आहे. हे नामजप चालू केल्याने मला नवीन चैतन्य मिळत आहे आणि अनुभूती येत आहेत. मी माझ्या संपर्कात येणार्यांनाही नामजप करण्यास सांगणार आहे. ज्यांना अडचण आहे, त्यांना कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप सांगण्याचा मी संकल्प करत आहे.
– श्री. चिदंबर पी. निंबरगी, धारवाड, कर्नाटक. (२०.८.२०२३)