DMK Muslim Apeasement : कट्टर हिंदुद्वेष्टा महंमद जुबेर याला तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून सांप्रदायिक सद्भाव पुरस्कार घोषित !
भाजपने केला विरोध !
चेन्नई (तमिळनाडू) : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी प्रजासत्ताकदिनी ‘अल्टन्यूज’ या हिंदुद्वेष्ट्या वृत्तसंकेतस्थळाचा सहसंस्थापक महंमद जुबेर याला राज्य सरकारचा ‘सांप्रदायिक सद्भाव’ पुरस्कार घोषित केला आहे. सामाजिक माध्यमांतून चिथावणीखोर आणि विद्वेषी पोस्टद्वारे हिंसा भडकावण्याच्या विरोधात जुबेर याने कार्य केल्याचे सांगत मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी त्याचे कौतुक केले. जुबेर याने तमिळनाडूतील प्रवासी मजुरांवरील कथित आक्रमणाची पोस्ट निराधार असल्याचे सिद्ध केले होते, असे स्टॅलिन या वेळी म्हणाले. भाजपने या पुरस्काराला विरोध केला आहे.
The Chief Minister of Tamil Nadu, MK Stalin, confers Communal Harmony Award to staunch Hindu-hater Mohammed Zubair – BJP opposes it.
'Excessive hatred towards Hindus is equivalent to communal harmony,' seems to be the definition of the Tamil Nadu Government.
Since Zubair… pic.twitter.com/dzmRe9vbks
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 27, 2024
१. जुबेर याला ‘कोट्टई अमीर सांप्रदायिक सद्भाव पुरस्कार’ दिला जाणार आहे. वर्ष २००० पासून सांप्रदायिक सद्भावाचा पुरस्कार करणार्या राज्यातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. जुबेर हा तमिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील नागरिक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
२. ‘एक्स’द्वारे एक पोस्ट करून भाजपचे तमिळनाडू अध्यक्ष के. अण्णामलाई म्हणाले की, एक पक्षपाती आणि मोडतोड करून सूत्र मांडणार्याला सामाजिक सद्भाव पुरस्कार प्रदान करणे, हे आतापर्यंत ज्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे, त्या सर्वांचा अवमानच होय.
संपादकीय भूमिका‘हिंदूंचा अत्याधिक द्वेष करणे म्हणजे सांप्रदायिक सद्भाव’, अशी तमिळनाडू सरकारची व्याख्या असल्याने आणि जुबेर त्याचीच री ओढत असल्याने असे घडणे, यात काय आश्चर्य ? |