मुंबईत शस्त्रधारी गाडी आणि व्यक्ती सापडल्याचा खोटा संदेश
एका संशयिताला अटक !
मुंबई – व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम यांवर खोटा संदेश पाठवणार्यांच्या विरोधात ट्राँबे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ‘शस्त्रधारी व्यक्ती आणि गाडी यांना अणुशक्तीनगर परिसरात पकडण्यात आल्या’चा खोटा संदेश आरोपीने सामाजिक माध्यमांवर पसरवला होता. त्यामुळे ट्राँबे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे पोलिसांच्या तपासणीत निष्पन्न झाले. या प्रकरणी एका संशयिताला कह्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी स्वतः गुन्हा नोंद केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.