मिरज येथे अवैध धंद्यावर कारवाई न केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाचे पोलीस मुख्यालयात तडकाफडकी स्थानांतर !
मिरज, २६ जानेवारी (वार्ता.) – शहरातील गांधी चौकाच्या क्षेत्रात अवैध धंदे चालू असतांनाही त्याच्यावर कारवाई न केल्याप्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांचे पोलीस मुख्यालयात तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले आहे. मिरज येथील काही भागांत अवैध धंद्यासह मटका जोमात चालू असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे केल्या होत्या. त्यामुळे बसवराज तेली यांच्या विशेष पथकाने अवैध धंद्यावर धाड घातली. अवैध धंदे बंद करण्याचे आदेश असतांनाही ते उघडपणे चालू असल्यामुळे भालेराव यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. (आदेश असतांनाही कारवाई का केली नाही ? अवैध धंदे चालू रहावेत यासाठी पोलीस पैसे घेत होते का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)
संपादकीय भूमिकाकेवळ स्थानांतर करून पोलीस अधिकार्यांच्या वृत्तीत फरक पडणार का ? अशा पोलीस अधिकार्यांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात पाठवले पाहिजे ! |