नागपूर येथील सिद्धेश्वर विद्यालयातील पोषण आहारात सडलेल्या केळ्यांचे वाटप
नागपूर – येथे मानेवाडा रस्त्यावरील सिद्धेश्वर विद्यालयातील शालेय पोषण आहारात २४ जानेवारी या दिवशी बुरशी लागलेली, सडलेली आणि दुर्गंधी येणारी, निकृष्ट केळी वाटल्याचे समोर आले आहे. ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांचे वितरण थांबवण्यात आले.
१ ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंडी आणि केळी यांचा पोषण आहार गेल्या २ मासांपासून वाटला जात आहे. वरील शाळेतील पोषण आहाराचे कंत्राट एका महिला बचतगटाकडे आहे.
शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी वरील गोष्ट घडल्याचे सत्य असल्याचे सांगून ‘संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल’, असे आश्वासन दिले.
संपादकीय भूमिकासर्वच पोषण आहाराच्या पदार्थांची समयमर्यादा, ते येतांना खराब असतात कि येथे आल्यावर होतात, पोषण आहार वाटतांना या गोष्टी लक्षात न येणे आदी सर्वच बारकाव्यांसहित या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हायला हवी ! |