‘विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेने अव्वल स्थान पटकावले !

दुसर्‍या स्थानी पनवेल, तर तिसर्‍या स्थानी कोल्हापूर महापालिका !

मिरज, २६ जानेवारी (वार्ता.) – ‘विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत  सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेने अव्वल स्थान पटकावले आहे. दुसर्‍या स्थानी पनवेल महापालिका, तर तिसर्‍या स्थानी कोल्हापूर महापालिका आहे. १० जानेवारी या दिवशी सांगली मारुति चौक येथे पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते आणि महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, भाजपचे नेते शेखर इनामदार यांच्या उपस्थितीत ‘विकसित भारत संकल्प रथा’चे स्वागत करून ही यात्रा चालू करण्यात आली होती. १९ जानेवारी या दिवशी सांगली येथील संजयनगर येथे भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे आणि उपायुक्त सौ. स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली होती.

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ हा एक शासकीय उपक्रम आहे. आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, पी.एम्. सुरक्षा विमा, पी.एम्. स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना आदी प्रमुख केंद्रशासनाच्या योजनांविषयी नागरिकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्या योजनांच्या कार्यवाहीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.