रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वर्धिनी गोरल (वय २७ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

सौ. वर्धिनी गोरल

१. देवाच्या स्मरणात राहून सेवा करत असतांना पायात होणार्‍या वेदनांची जाणीव न होणे; मात्र विश्रांती घेतांना वेदनांची जाणीव होणे

‘वर्ष २०१८ मध्ये माझा उजवा पाय पटलाला आपटून दुखापत झाली होती. त्यानंतर त्या पायात पुष्कळ वेदना होत होत्या. त्यावर उपचारही चालू होते, तरीही वेदना न्यून होत नव्हत्या. काही वेळा पायांत असह्य वेदना होत असत; मात्र देवाची कृपा अशी की, ‘मी सेवा करत असतांना मला वेदना जाणवत नसत.’ मी विश्रांती घेत असतांना ‘मला त्रास होत आहे’, असे लक्षात येत असे. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपण अखंड देवाचे स्मरण करत सेवा केल्यास आपले अन्य गोष्टींकडे लक्ष जात नाही. देव प्रत्येक क्षणी आपल्या समवेत आहे’, हे अनुभवता येते.’

२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत आरती करतांना देवताही आरती करत आहेत’, असे सूक्ष्मातून जाणवणे

मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील देवांची पूजा करत होते. पूजा झाल्यावर आरती करतांना मला सूक्ष्मातून ‘प्रत्यक्ष देवता माझ्या समवेत आरती म्हणत आहेत. प्रत्येक देवता वाद्य वाजवत आहे. कुणी वीणा वाजवत आहे, कुणी तबला वाजवत आहे, कुणी पेटी वाजवत आहे, कुणी टाळ (झांज) वाजवत आहे’, असे अनुभवता येते.’

– सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.