तुम्ही देशासाठी काय करता ?
तुम्ही मला १० मिनिटे देत असाल, तर मी माझ्या प्रतिक्रिया व्यक्त करतो. आमच्या देशासाठी १० मिनिटे आहेत ना तुमच्याजवळ ? वेळ असल्यास वाचा अन्यथा सोडून द्या.
- तुम्ही म्हणता प्रशासन अकार्यक्षम आहे.
- तुम्ही म्हणता आमचे कायदे पुष्कळ जुने झाले आहेत.
- तुम्ही म्हणता नगरपालिका कचरा नेत नाही.
- तुम्ही म्हणता दूरभाष चालत नाहीत, रेल्वे म्हणजे तर विनोदच, विमान वाहतूक तर संपूर्ण जगात अगदीच रद्द आणि आमचे टपाल तर कधीच वेळेवर पोचत नाहीत.
भारत असा आहे, असे तुम्ही फक्त म्हणत असता, तक्रार करत असता; परंतु त्याकरता तुम्ही काय करता ?
– ए.पी.जे. अब्दुल कलाम