जपानी लोकांच्या यशाचे रहस्य म्हणजे त्यांची देशभक्ती !
‘भारताबरोबरच जपानलाही स्वातंत्र्य मिळाले; परंतु जपानमध्ये नागासाकी, हिरोशिमा या शहरांवरच बॉम्ब पडले होते. जपान पूर्ण बेचिराख झाला होता; पण मधल्या काळात जपानने पूर्ण प्रगती केली. संपूर्ण राखेतूनच त्यांनी भरारी घेतली. प्रगत झालेल्या यशाचे रहस्य जपानी लोकांच्या देशभक्तीमध्येच आहे. संकटाच्या काळात जपानच्या प्रत्येक नागरिकाने रोज २-२ तासाचे काम विनावेतन केवळ राष्ट्र्राच्या उन्नतीसाठीच केले. जपानमध्ये एकमेकांवर असणारा विश्वास, स्वाभिमान, प्रेम हे फार आहे. जपानी लोेकांनी उभारलेल्या उद्योगामध्ये आपल्या देशाविषयीचे प्रेम दिसून येते. त्याचेच उदाहरण म्हणजे ‘एखादे लहान खेळण्यातील गाडीचे चाक मी जर नीट बसवले नाही, तर हे खेळणे जेव्हा परदेशात जाईल, तेव्हा माझ्या देशाचा अपमान होईल’, अशा पद्धतीने जपानी माणूस आपले काम वेळेवर, दर्जेदार व अत्यंत चांगल्या रितीने, त्यामध्ये कोणताही दोष न ठेवता करत आहे.’
(मासिक ‘लोकजागर’)