दुष्प्रवृत्तींना वेळीच रोखणे आवश्यक !
जे साधू, संत आणि सज्जन हिंदु, म्हणजेच आर्य आहेत, त्यांचे रक्षण करणे आणि दुष्टांचे निर्दालन करणे, हे राजाचे कर्तव्यच आहे, असे भगवद्गीतेत सांगितले आहे. याचा अर्थ आहे, ‘साधु, संत, सज्जन यांनी साधनेद्वारे प्राप्त केलेल्या चैतन्याचा राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रगतीसाठी उपयोग करून घेणे आणि धर्मांध दुष्कृतींचा विरोध करणे, म्हणजेच आज धर्मांधांचे जे लांगूलचालन चालू आहे, ते देवाला अपेक्षित नाही. या धर्मांधांना आपण सत्याची जाणीव करून न देणे, त्यांचा आश्रय घेणे, हे चुकीचे आहे. अशा दुष्ट विचारांना आणि प्रसंगी अतिरेक्यांसारख्या धर्मांध व्यक्तींना विरोध केल्याशिवाय देशातील सज्जन शक्ती बळावणार नाही. तसे झाले, तरच अधिकाधिक लोक सज्जनतेकडे, म्हणजे धर्माचरणाकडे वळतील. तेव्हाच भारतासह विश्वात शांती आनंदमय वातावरण दिसेल.
– प.पू. परशराम पांडे महाराज